Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई ! बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी; ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ? गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा, अन्‌ राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना? तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे - जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ; नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते , अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते. नाही जगात झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची. चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा, आई हवी महणूनी सोडी न जीव हेका. विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही, आईविणे परी मी हा पोरकाच राही. सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे , तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे . आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे ! कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे . किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती, अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती ! ही भूक पोरक्याची होई न शांत आई पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही वाटे इथूनि जावे , तूझ्यापुढे निजावे नेती तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे ! वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके , देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके? घे जन्म तू फिरुनी , येईन मीहि पोटी, खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करु मी ?

गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,
अन्‌ राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे ;

नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते ,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.


चिती तुझी स्मरे ना काहीच रूपरेखा,
आई हवी महणूनी सोडी न जीव हेका.


विद्याधनप्रतिष्ठा  लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे ,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे .

आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे .


किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे , तूझ्यापुढे निजावे
नेती तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे !
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?

घे जन्म तू फिरुनी , येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

Post a Comment