तुझ्या आठवणींसोबत तूही असावी
प्रितीची नवी नवलाई असावी
तुला का माझी तमा ही नसावी
पून्हा आज अश्रुंनी धरती भिजावी
स्वप्नातल्या आठवणींचा उमाळा
प्रेमातल्या नात्यांचा हा जिव्हाळा
आता वेदनांची ही व्यथा सरावी
पुन्हा आज अश्रृंनी धरती भिजावी
निष्पाप या नात्यातील दुरावा
सुक्या या फुलांचा सुगंध उरावा
कॅधी वनवासाची ही कथा सरावी
पून्हा आज अश्रृंनी धरती भिजावी
कधी संकटाची ही रात्र सरावी
नव्या विश्वासाची ही सकाळ यावी
माझ्या वास्तव जगाची कथा तुला कळावी
पून्हा अज अश्रृंनी धरती भिजावी...
कवी - अमोल गरुड
Posts
पून्हा आज - कविता
कविता
तुझ्या आठवणींसोबत तूही असावी
प्रितीची नवी नवलाई असावी
तुला का माझी तमा ही नसावी
पून्हा आज अश्रुंनी धरती भिजावी
स्वप्नातल्या आठवणींचा उमाळा
प्रेमातल्या नात्यांचा हा जिव्हाळा
आता वेदनांची ही व्यथा सरावी
पुन्हा आज अश्रृंनी धरती भिजावी