Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link
Posts

माझा बाबा- कविता

कविता- व्याकुळ झाले हे मन, डोळ्यात अश्रू आले। आधार नाही आता, माझे बाबा दूर गेले।। व्याकुळलो भेटीसाठी, ना पुन्हा तुम्ही मज भेटे। गहिवरून आले मन, डोळ्यात अश्रू दाटे।। कोणी गाव सांगत नाही, ना पत्ता देई कोणी। मी वाट पाहतो तुमची, तुम्हा जगात शोधील तिन्ही।। माझे बाबा दूर गेले, आधार कुणाचा घेऊ। करू नका पोरके आम्हा, बाबा अनाथ आम्ही होऊ।। आत्ता येणार नाहीत पुन्हा, बाबा इतके दूर का गेला। विश्वास होत नाही, की माझा बाबा खरंच मेला।। आईचे कुंकू पुसले, बापाचे छत्र सुटले। बापाला उठवा कोणी, का डोळे तुम्ही मिटले।। तुम्हा उठवत नाही कोणी, का शांत इतके निजले। कंठात हुंदका दाटे, मुख आसवांनी भिजले।। काळाने घात केला, माझा बाबा घेऊन गेला। अर्ध्यावर सोडून गेले, आम्ही काय गुन्हा केला।। कमतरता तुमची बाबा, ना कधीच पूर्ण होईल। तुमच्या मिठीत येण्याचे, ते स्वप्न स्वप्न च राहील।। ते स्वप्न स्वप्न च राहील।। ते स्वप्न स्वप्न च राहील।।

व्याकुळ झाले हे मन,
डोळ्यात अश्रू आले।
आधार नाही आता,
माझे बाबा दूर गेले।।

व्याकुळलो भेटीसाठी,
ना पुन्हा तुम्ही मज भेटे।
गहिवरून आले मन,
डोळ्यात अश्रू दाटे।।

कोणी गाव सांगत नाही,
ना पत्ता देई कोणी।
मी वाट पाहतो तुमची,
तुम्हा जगात शोधील तिन्ही।।

माझे बाबा दूर गेले,
आधार कुणाचा घेऊ।
करू नका पोरके आम्हा,
बाबा अनाथ आम्ही होऊ।।

आत्ता येणार नाहीत पुन्हा,
बाबा इतके दूर का गेला।
विश्वास होत नाही,
की माझा बाबा खरंच मेला।।

आईचे कुंकू पुसले,
बापाचे छत्र सुटले।
बापाला उठवा कोणी,
का डोळे तुम्ही मिटले।।

तुम्हा उठवत नाही कोणी,
का शांत इतके निजले।
कंठात हुंदका दाटे,
मुख आसवांनी भिजले।।

काळाने घात केला,
माझा बाबा घेऊन गेला।
अर्ध्यावर सोडून गेले,
आम्ही काय गुन्हा केला।।

कमतरता तुमची बाबा,
ना कधीच पूर्ण होईल।
तुमच्या मिठीत येण्याचे,
ते स्वप्न स्वप्न च राहील।।

ते स्वप्न स्वप्न च राहील।।
ते स्वप्न स्वप्न च राहील।।

कवी- रामदास पवार

Post a Comment