Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link
Posts

शेतकरी बाप- कविता

कविता- पिकांतुन वारवावधानं सुटल्यावर बापाचं मन घरट्यासारखं झुलायचं। हलकं नव्हतं खंबीर मन त्याचं पण उगाचं वार्यासंग हलायचं। कशामुळे उठायचे हे तवंग ? तुफानाच्या भितीनं मनामधी। कुठल्या काळजीत असायचा बापं? उगाचं फिरत पिकामधी... का छळायची प्रक्रती त्याला, कुंचले मारून आभाळात ढगांचे। जेव्हा डोळे काढून ढगांकडे पाही न तो न बरसताचं ते ढग पळायचे। का चालायचा संघर्ष एवढा आभाळासंग माझ्या कुणबी बापाचा निसर्गाचीचं रात्रंदिन सेवा करताना जगापेक्षाही कोप व्हायचा त्याचा हे एवढं कशासाठी? पाझरायचं बापाचं मनं त्यानं कष्टात घाम मिसळून उगविलेलं जपलं जावं त्याचं हिरवं धनं
पिकांतुन वारवावधानं सुटल्यावर
बापाचं मन घरट्यासारखं झुलायचं।
हलकं नव्हतं खंबीर मन त्याचं
पण उगाचं वार्यासंग हलायचं।

कशामुळे उठायचे हे तवंग ?
तुफानाच्या भितीनं मनामधी।
कुठल्या काळजीत असायचा बापं?
उगाचं फिरत पिकामधी...

का छळायची प्रक्रती त्याला,
कुंचले मारून आभाळात ढगांचे।
जेव्हा डोळे काढून ढगांकडे पाही न तो
न बरसताचं ते ढग पळायचे।

का चालायचा संघर्ष एवढा
आभाळासंग माझ्या कुणबी बापाचा
निसर्गाचीचं रात्रंदिन सेवा करताना
जगापेक्षाही कोप व्हायचा त्याचा

हे एवढं कशासाठी?
पाझरायचं बापाचं मनं
त्यानं कष्टात घाम मिसळून उगविलेलं
जपलं जावं त्याचं हिरवं धनं

कवी - आकांक्षा भवर 

Post a Comment