Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

इवल्याइवल्याशा- कविता

इवल्याइवल्याशा टिकल्याटिकल्यांचें देवाचे घर बाई, उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी निळीनिळी वाट निळेनिळे घाट निळ्यानिळ्या पाण्याचे झुळुझुळु पाट निळ्यानिळ्या डोंगरांत निळीनिळी दरी
इवल्याइवल्याशा
टिकल्याटिकल्यांचें
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी

निळीनिळी वाट
निळेनिळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे
झुळुझुळु पाट
निळ्यानिळ्या डोंगरांत
निळीनिळी दरी

चांदीच्या झाडांना
सोन्याची पानें
सोनेरी मैनेचें
सोनेरी गाणें
सोन्याची केळीं
सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला
सोन्याची कैरी

देवाच्या घरात
गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची
अंथरली गादी
चांदण्याची हंडी
चांदण्याची भांडी
चांदोबाचा दिवा
मोठा लावला वरी