Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

नदी- कुसुमाग्रज

नदीबाई माय माझी डोंगरात घर लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर नदीबाई आई माझी निळे निळे पाणी मंद लहरीत गाते ममतेची गाणी नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्यांना देई कोणी असो कसा असो भेदभाव नाही शेतमळे मायेमुळे येती बहरास थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास श्रावणात आषाढात येतो तिला पूर पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला थांबत्याला पराजय चालत्याला जय कवी – कुसुमाग्रज
नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर

नदीबाई आई माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी
नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्यांना देई
कोणी असो कसा असो भेदभाव नाही
शेतमळे मायेमुळे येती बहरास
थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास
श्रावणात आषाढात येतो तिला पूर
पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर
माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय
कवी – कुसुमाग्रज

Post a Comment