Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link
Posts

नि...शब्द- कविता

कविता- मंद बोलणारे धुंद डोलणारे सत्य सांगणारे शब्द हे... गूज साधणारे गूढ खोलणारे दंभ फोडणारे शब्द हे.... मूक भांडणारे युद्ध मांडणारे रक्त सांडणारे शब्द हे.... भेद टाळणारे शब्द पाळणारे चंद्र बोलणारे शब्द हे... मुक्त रंगणारे चित्त दंगणारे प्रेम भंगणारे शब्द हे... वैर मोडणारे पाश तोडणारे स्नेह जोडणारे शब्द हे... भाव फुलवणारे दुःख भुलवणारे घाव सोसणारे शब्द हे... गोड लाजणारे मुग्ध हासणारे देव भासणारे शब्द हे...

मंद बोलणारे
धुंद डोलणारे
सत्य सांगणारे
शब्द हे...

गूज साधणारे
गूढ खोलणारे
दंभ फोडणारे
शब्द हे....

मूक भांडणारे
युद्ध मांडणारे
रक्त सांडणारे
शब्द हे....

भेद टाळणारे
शब्द पाळणारे
चंद्र बोलणारे
शब्द हे...

मुक्त रंगणारे
चित्त दंगणारे
प्रेम भंगणारे
शब्द हे...

वैर मोडणारे
पाश तोडणारे
स्नेह जोडणारे
शब्द हे...

भाव फुलवणारे
दुःख भुलवणारे
घाव सोसणारे
शब्द हे...

गोड लाजणारे
मुग्ध हासणारे
देव भासणारे
शब्द हे...

कवी- अमोल बोंढारे

Post a Comment