Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

मराठी गोष्ट भाग- 1

नदीच पाणी खळखळत होत, ते पाणी कुठून कुठून अलगद वाट शोधत पुढे जात होतं....नदीच्या किनारी मोठेच मोठे झाडे होती, त्या झाडाच्या पानाचा सळसळ असा आवाज कानी येत होता...झाडाच्या फांद्यावर पक्षी इकडून तिकडे उड्या मारत होती, त्याचा चिवचिवाट सुरात ऐकायला येत होता.

****( भाग एक )


नदीच पाणी खळखळत होत, ते पाणी कुठून कुठून अलगद वाट शोधत पुढे जात होतं....नदीच्या किनारी मोठेच मोठे झाडे होती, त्या झाडाच्या पानाचा सळसळ असा आवाज कानी येत होता...झाडाच्या फांद्यावर पक्षी इकडून तिकडे उड्या मारत होती, त्याचा चिवचिवाट सुरात ऐकायला येत होता... झाडाच्या पानाला वार कधी अलगद स्पर्श करत होत तर कधी जोरात स्पर्श करून पळून जात होतं.....वाऱ्याचे इकडून तिकडे पळणे सुरू असतानाच तिच्या कानातले कुंडल हळूच नागोब्या सारखे डुलत होते....लांबच लांब कुंडले तिच्या खांद्याला हळुवार स्पर्श करत होते...त्यात तिच्या गुंफलेल्या केसांच्या बटा कैदेतुन मुक्त होऊ पाहत होत्या....तिचा तो नाजूक हात त्यांना रोखण्याचा निषफळ प्रयत्न करत होता.....वाऱ्याने आज थैमान घातले होते.... तिचा दुपट्टा ही आता उडू लागला होता तिचा दुसरा हात दुपट्टा सांभाळत होता... असे करताना तिची पार तारांबळ उडालेली होती... तिची भेदक नजर मनगटावर राहून राहून पडत होती . मनगटावरील घड्याळ सुद्धा वाऱ्यासारखा सुसाट धावतो की काय??? असा प्रश्न तिच्या नाजूक मनाला पडत होता....तिचे दोन्ही पाय रेतीवर काहीतरी रेखाटण्याचा प्रयत्न करत होते. कधी एक हात बटेवर पडत होता तर कधी दुपट्टा सावरत होता तर कधी तोच हात छोटेछोटे दगड पाण्यात सोडत होता....आता कोमल चेहरा लाल होत होता तो उन्हाचा परिणाम असावा की रागाचा हे कळायला मार्ग नव्हता....शेवटी तिची नजर ज्याला शोधत होती तो अखेर तिथे आला....मोठ्या प्रेमाने दोन्ही हात कानाला लावत तोंडातल्या तोंडात केविलवानी मुखानी sorry म्हणत होता.... ही काही न बोलताच कडेला लावलेल्या गाडीत जाऊन बसली, तो सुद्धा तिच्या मागेमागे गेला तिने आपले तोंड दुसरीकडे फिरवले आणि वारा सुद्धा तिच्या रुसण्याला साद घालत होता तो पुन्हा गाडीच्या दुसऱ्या कडेला गेलाव समजावण्याचा सुरात म्हणाला,
Am so sorry beta.....
डोळे विस्फारत तिने नाक मुरडले, आणि मनगटावरील घड्याळात बघत ती म्हणाली
 Its too late pappa...
Am so sorry beta.....
डोळे विस्फारत तिने नाक मुरडले, आणि मनगटावरील घड्याळात बघत ती म्हणाली
 Its too late pappa...
तो पुन्हा तिला sorry बोलला व तिने गोड स्मित दिले. आता दोघे गाडीत बसले.... गाडी सुसाट वेगाने धावत होती...तिच्या  केसांच्या लट हवेत मनसोक्त खिदळत होत्या....आणि तिचे डोळे हवेला प्रतिकार करून हळूच लापापत होते....तो गाडी चालवत कोणाशी तरी फोन वर बोलत होता. ती मस्त हवेचा आस्वाद घेत होती. त्यांची जीप चड उतार पार करत होती. कधी नाले लागत तर कधी फुलांचे बगीचे तर कधी जंगल वाट. ती सगळेच दृश्य मोबाईल मध्ये साठवत होती. तो तिच्याकडे बघत स्मित करत होता. त्याने तिच्याकडे बघत डोक्यावरून हलकेच हात फिरवला तोच तिने त्यांचे कडे बघितले. ती सध्या बाहेरील देशात शिक्षण घेत होती. म्हणजे लहानपणापासून च ती दुसऱ्या देशात शिकायला होती. त्यामुळे भारतात ती पहिल्यांदा च आलेली. भारतात न राहून सुद्धा संपूर्ण भारतीय संस्कृती जपली होती. दोघेही शांत होते , वातावरणाचा आनंद दोघेही घेत असावे बहुधा.....शेवटी तिनेच शांतता भंग केली,
पप्पा... किती सुंदर आहे ना हे सगळे
तो नुसता तिच्याकडे बघत हसला व पुन्हा गाडी चालवू लागला...
ती पुन्हा म्हणाली
पप्पा आपल्या भारताचे सौंदर्य किती सुंदर आहे ना.....
तो तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाला,
हो रे...म्हणून तर आपल्या भारताला भारत माता म्हणतात...
ती हसली व पुन्हा खिडकीबाहेर बघू लागली व चेहरा नाराज करत त्याच्या कडे बघत म्हणाली,
मग पप्पा, मला इथेच का नाही ठेवत तुम्ही...का पाठवले विदेशात...
हे वाक्य ऐकताच तो तिच्याकडे एकटक बघू लागला
ती पुन्हा त्याच्या हाताला धरत म्हणाली
बाबा......
तिने बाबा म्हणताच त्याने कचकन ब्रेक दाबला...अत्यंत वेगात धावणारी जीप लगेच थांबली ....तिचा तोल सुटला व ती समोर गेली तोच तिला त्याने हाताने सावरले...
तू ठीक आहेस ना बेटा
ही केस सरळ करत म्हणाली
होय...
पुन्हा ती म्हणाली मला इथेच का नाही ठेवत तुम्ही तुमच्याजवळ????
तो म्हणाला, मघाशी तू माझा हात धरत काय म्हणालीस...
बाबा.....का हो काय झालं
अग ऐक ना मला बाबा च म्हणत जा ना...
नक्कीच बाबा पण माझ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही दिले नाही....
तो तिला म्हणाला,
आज वेळ आली आहे तुला सगळे खरे सांगण्याची.... बैस गाडीत सगळं सांगतो तुला....
गाडी पुन्हा जोरात चालू लागली आणि एका ठिकाणी गाडी जाऊन थांबली
तेथील दृश्य बघून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले व ती त्यांच्याकडे बघू लागली....


क्रमशः

पुढील भाग लवकरच...

Post a Comment