Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link
Posts

मी मुक्त व्हाव- कविता

कविता-मी माझ्यातल्या मला आज डोळेभरून पहावे, वाटते पुनः मी मला आज मुक्त करावे.... गोठयामधी दावं असु द्यावं तसच, ठेकेदाराचा डोळा चुकवुन मी मजपासुन दूर पळावे... डाबरून आलेल्या जखमेला मी पुनः खरचटून घ्यावे, आज वाटते मी मला ऊंचावरुन धप्पदीशी पडावे...

मी माझ्यातल्या मला
आज डोळेभरून पहावे,
वाटते पुनः मी मला
आज मुक्त करावे....

गोठयामधी दावं
असु द्यावं तसच,
ठेकेदाराचा डोळा चुकवुन
मी मजपासुन दूर पळावे...

डाबरून आलेल्या जखमेला मी
पुनः खरचटून घ्यावे,
आज वाटते मी मला
ऊंचावरुन धप्पदीशी पडावे...

सोड़ावे अंधारात मी
डब्बीतले काजवे..
न् टीमटीमनार्या तार्यागत
मी नाचून घ्यावे...

 वाटते आज मंगळसूत्र
वळचटणीला टांगावे,
भांग भरून छुपा मी
आज स्वछंद हूंदड़ावे...

पायी घेतलेली पैंजणं
धूड़कावुन द्यावी दूर,
वाटते आज आठवणीत
मी माझ्या न्हावुन निघावे...

सासुला मारावी मिठी
मी भरगच्च आईसारखी,
न् तिलाही ठेकेदारापासुन
पळवुन मी न्यावे...

मला वाटते आज मी माझे
हरवलेले जुने स्वप्न पहावे,
तेव्हा सारखं मी मला
एक धाड़सी आव्हान द्यावे...

वाटते हया बंधनातून
मी सोड़वुन स्वतःला,
नागिनीसारखी सळसळत
मी निसटून जावे...

खोदावी कबर स्मशानात
न् मापाकरिता झोपून पहावे,
मी माझ्या आठवांच्या
पोळयासकट उडुन जावे....

वेदनेच्या तळाची
मुठभर माती उचलुन घ्यावी,
न् सौभाग्यवती होण्याच
दुःख मी आनंदाने पचवून घ्यावे...

वाटते आज मला
मी मुक्त व्हावे......,

कवी - अस्मिता तांबे

Post a Comment