Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

वेळ- कविता

आज आहे, उद्या नाही, तरी वेळेच भान नाही, घड्याळ जरी मालकीची, तरी काट्याला थांबा नाही. कळते सर्व पण वळत नाही, वेळ जातो पण आळस नाही, मग पश्चातापाला कारण राही, वेळ कुणाच्या हातात नाही. प्रत्येकासाठी वेळ निश्चित नसे, तरी जगतो असा, जसा शतायुषी असे. मग ध्येय गाठन्यासाठी वेळ अपुरा पडे, अन आयुष्यभर नशिबाला च कोसत बसे. निर्मिती नंतर निर्मिती च होत गेली, निर्मिकाची निर्मिती सुद्धा वेळेने च झाली, वसुंधरे ची परिक्रमा कधी थांबणार च नाही, अन थांबलीच,  तर तिच्या अंताच दुःख ब्रह्मांडाला होणार नाही. म्हणून प्रत्येकाने वक्तशीर असावं, अन प्रत्येक क्षण आनंदात राहावं, भूतकाळ विसरून वर्तमानात जगावं, अन आयूष्याला सकारात्मक नजरेतून पहावं..

आज आहे, उद्या नाही,
तरी वेळेच भान नाही,
घड्याळ जरी मालकीची,
तरी काट्याला थांबा नाही.

कळते सर्व पण वळत नाही,
वेळ जातो पण आळस नाही,
मग पश्चातापाला कारण राही,
वेळ कुणाच्या हातात नाही.

प्रत्येकासाठी वेळ निश्चित नसे,
तरी जगतो असा, जसा शतायुषी असे.
मग ध्येय गाठन्यासाठी वेळ अपुरा पडे,
अन आयुष्यभर नशिबाला च कोसत बसे.

निर्मिती नंतर निर्मिती च होत गेली,
निर्मिकाची निर्मिती सुद्धा वेळेने च झाली,
वसुंधरे ची परिक्रमा कधी थांबणार च नाही,
अन थांबलीच,  तर तिच्या अंताच दुःख ब्रह्मांडाला होणार नाही.

म्हणून प्रत्येकाने वक्तशीर असावं,
अन प्रत्येक क्षण आनंदात राहावं,
भूतकाळ विसरून वर्तमानात जगावं,
अन आयूष्याला सकारात्मक नजरेतून पहावं..

कवी : दिक्षांत दाभाडे

Post a Comment