Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link
Posts

स्वप्न- कविता

रात्री स्वप्नात येऊन स्वप्न मला म्हणाले तू जपायला हवं होतंस, तुझ्या स्वप्नांना..! वाटेच्या वळणावर वळता-वळता स्वप्न मागेच राहिले स्वप्नात येऊन स्वप्न मला म्हणाले., गुलमोहराची पानगळ सुरू झाली राजाराणीने माना टाकल्यात अश्रूधारांनी चेहऱ्यावरील लाली वाहून नेली खोडही आता जीर्ण दिसू लागले आहे... चिमुकल्या पाखरांना मीच हुसकावून लावतो आता काळवंडलेल्या गुलमोहर बसून माझी सोबत करण्याची त्यांनाही परवानगी नाही., मात्र चिमुकली पाखरे पुन्हा पुन्हा इथे येतात...! हल्ली मी निजतही नाही मृत्यूच्या दाढेतून निसण्यासाठी आभाळाकडे झेपावणाऱ्या त्या अंतिम हिरव्या देठाकडे एकटक पहात राहतो., कधी हा रुक्ष राक्षस त्यास गिळंकृत करेल आणि मीही अखेर माझे डोळे मिटून घेईल...! गुलमोहराच्या बुंध्याशी बसून कुढत राहण्याची मला सवय झाली आहे प्रवासाच्या वाटेकडे आता मी ढुंकूनही पाहत नाही..
रात्री स्वप्नात येऊन
स्वप्न मला म्हणाले
तू जपायला हवं होतंस,
तुझ्या स्वप्नांना..!
वाटेच्या वळणावर वळता-वळता
स्वप्न मागेच राहिले
स्वप्नात येऊन स्वप्न मला म्हणाले.,

गुलमोहराची पानगळ सुरू झाली
राजाराणीने माना टाकल्यात
अश्रूधारांनी चेहऱ्यावरील लाली वाहून नेली
खोडही आता जीर्ण दिसू लागले आहे...

चिमुकल्या पाखरांना
मीच हुसकावून लावतो आता
काळवंडलेल्या गुलमोहर बसून
माझी सोबत करण्याची
त्यांनाही परवानगी नाही.,
मात्र चिमुकली पाखरे
पुन्हा पुन्हा इथे येतात...!

हल्ली मी निजतही नाही
मृत्यूच्या दाढेतून निसण्यासाठी
आभाळाकडे झेपावणाऱ्या
त्या अंतिम हिरव्या देठाकडे
एकटक पहात राहतो.,
कधी हा रुक्ष राक्षस त्यास गिळंकृत करेल
आणि मीही अखेर माझे डोळे मिटून घेईल...!

गुलमोहराच्या बुंध्याशी बसून
कुढत राहण्याची मला सवय झाली आहे
प्रवासाच्या वाटेकडे आता
मी ढुंकूनही पाहत नाही..
बोचणारी थंडी मला झोंबत नाही,
उन्हाची किरणे मला जाळत नाही,
मुसळधार पाउसही आता
माझ्यावर बरसत नाही...!

स्वप्न मला म्हणाले.,

तू एकदा'च' परत ये
या वाटेच्या वळणावर.,
इंद्राच्या दरबाराकडे डोळे लावून पाहणाऱ्या
त्या हिरव्या देठाकडे तू अखेरचं बघ
आणि कुऱ्हाडीने कत्तल करून टाक
यमसदनासाठी आतुरलेल्या या गुलमोहराची..!

अरे!! कुठे चाललास.??
मला परत मागे ठेवून जाऊ नकोस,
एक घाव अखेरचा माझ्यावरही घाल.,
येथून माझी सुटका कर..
आता माझी हत्या नाकारून कसं चालेल..?
तू तेव्हाच जपायला हवं होतंस
तुझ्या स्वप्नांना...!!

कवी - अक्षय शिंदे

Post a Comment