Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

आयुष्याच्या वाटेवर...

गर्द झाडाच्या जंगलातून वाट स्वतःची शोधताना, कुणी वाटसरू भेटतं... भेट पहिलीच असूनही मन मोकळं करायला, थोडं जवळचं वाटतं... वारा आपसूक वाहतो झाडाची हिरवी पानं, आल्हाद सळसळतात.. चार शब्द सुख दुःखाचे, अलगद बोलल्यावर बंध आनामिक जुळतात... रानात भेटलेल्या पाखराला हळवी माया लावली की, अनोखा लळा लागतो... आयुष्याच्या वाटेवर भेटलेल्या एखाद्या समदुखी माणसाबद्दलही, माणुसकीचा उमाळा दाटतो... वाटा वेगवेगळ्या असूनही एकाच झाडाच्या फांदीवर, दोन पाखरं येतात... तसच जीवनाच्या वाटेवर भेटलेली दोन माणसंही, गाणं प्रेमाचं गातात..... ✍निखिल शार्दुल
गर्द झाडाच्या जंगलातून
वाट स्वतःची शोधताना,
कुणी वाटसरू भेटतं...
भेट पहिलीच असूनही
मन मोकळं करायला,
थोडं जवळचं वाटतं...

वारा आपसूक वाहतो
झाडाची हिरवी  पानं,
आल्हाद सळसळतात..
चार शब्द सुख दुःखाचे,
अलगद बोलल्यावर
बंध आनामिक जुळतात...

रानात भेटलेल्या पाखराला
हळवी माया लावली की,
अनोखा लळा लागतो...
आयुष्याच्या वाटेवर भेटलेल्या
एखाद्या समदुखी माणसाबद्दलही,
माणुसकीचा उमाळा दाटतो...

वाटा वेगवेगळ्या असूनही
एकाच झाडाच्या फांदीवर,
दोन पाखरं येतात...
तसच जीवनाच्या वाटेवर
भेटलेली दोन माणसंही,
गाणं प्रेमाचं गातात.....

✍निखिल शार्दुल

Post a Comment