Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

जेव्हापासून आक्षेप घेतला गेला...- कविता

मी श्रावण लिहीत नाही मी वसंतही लिहीत नाही मी पाऊस लिहीत नाही मी वाराही लिहीत नाही... खवळून उठतं हृदय खवळू देतो खुश्शाल, मी रड़णं लिहीत नाही आता हसणंही लिहीत नाहि...

मी श्रावण लिहीत नाही

मी वसंतही लिहीत नाही
मी पाऊस लिहीत नाही 
मी वाराही लिहीत नाही...

खवळून उठतं हृदय 

खवळू देतो खुश्शाल,
मी रड़णं लिहीत नाही 
आता हसणंही लिहीत नाहि...

मी आला थेंब सरसरत

तरी झेलून घेत नाही,
तहानलेल्या ओठांवरुन 
कधी निसटुनही देत नाही...

राहतात शब्द माझे ओठांच्या

उंबरठयाआतच आताशा,
मी एका पाऊलानेही
ओलांडुन देत नाही...

उठाव होतात बर्याचदा 

अधोमध कधी कधी..कधीतरीच,
त्या उठावाला सहसा आता 
उत्तर देत नाही...

शहार्यासकट कधीतर भावना

उभ्या असतात बंडाला पण,
मी बहाद्दर त्यांना 
लिहीत तर मुळीच नाही...
            
              साधं गुणगुणतही नाही
              मी गुणगुणतही नाही...
              जेव्हापासून आक्षेप घेतला
              मी लिहीत नाही....✍️✍️

कवी- अस्मिता तांबे 

Post a Comment