Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

गरिबी....

marathi lekh रामू अन राधा नवरा बायको. या दोघांच्या संसाराला फलस्वरूप दोन अपत्ये होती. रामू सालगडी म्हणून पाटलाच्या घरी होता अन राधा ही पाटील च्या शेतात पातीवर कामाला होती. घरात अठरा विश्वे दारिद्र. रामू दिवसभर राब राब राबायचा पण पोरीच्या लग्नासाठी पाटील कडून घेतलेलं कर्ज फिटता फिटत नव्हतं. राधा पण एक दिवस घरी राहत नसे. राधाच्या भरवश्यावर घर चालत असे. पोरगी दिल्या घरी सुखी होती. पण पोरग शाळा शिकत होत. रामू अन राधेला तोच एक आशेचा किरण आणणार होता. आपलं काही झालं तर चालायचंच पण पोराला कामाकड काढता कामा नाही असे रामू राधेला सांगत असे. रामुच धोतर थिजत होत. जिकडून वडाव तिकडून टराटरा फाटत जाणार होत. दोन धोतराची जोडी व दोन बंडी एवढंच होत एक शर्ट होत ते पण फाटायला आलेलं. कोण्या गावी नसता पोरीकडं जायचं तेव्हा घालायचा. राधाची पण अवस्था काही वेगळी नव्हती. लुगड्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या, पदर फाटला होता तरी डोक्यावर असायचा. लुगड्याच्या गाठी गाठी दिसायच्या. दोघेही वयान फार मोठी नव्हती पण दारिद्र्यान ते वयस्कर दिसत होते. मुलगा शाळेत जायचा. त्याच्या पण पॅन्ट ला राधान ठिगळ जोडुन दिले होते. दप्तर तर नव्हतेच पण एक पिशवी ती पण फाटून फाटून गेलेली होती. अर्धे पुस्तक त्याला हातात न्यावी लागायची. अशी रामू राधाच्या कुटुंबात दारिद्र्य ओसरून वाहत होत. गरिबी सुटता सुटत नव्हती. पण त्याच्या घरात आल्यागेल्याचा आदर, प्रेमळ बोलणं, प्रामाणिक वृत्ती, होतकरू स्वभाव, कर्तव्यदक्षता, माणुसकी, कष्टाळू वृत्ती दिसत होती..... मग गरीब कोण?????? लेखिका तेजस्विनी प्र.राऊत
रामू अन राधा नवरा बायको. या दोघांच्या संसाराला फलस्वरूप दोन अपत्ये होती. रामू सालगडी म्हणून पाटलाच्या घरी होता अन राधा ही पाटील च्या शेतात पातीवर कामाला होती. घरात अठरा विश्वे दारिद्र. रामू दिवसभर राब राब राबायचा पण पोरीच्या लग्नासाठी पाटील कडून घेतलेलं कर्ज फिटता फिटत नव्हतं. राधा पण एक दिवस घरी राहत नसे. राधाच्या भरवश्यावर घर चालत असे. पोरगी दिल्या घरी सुखी होती. पण पोरग शाळा शिकत होत. रामू अन राधेला तोच एक आशेचा किरण आणणार होता. आपलं काही झालं तर चालायचंच पण पोराला कामाकड काढता कामा नाही असे रामू राधेला सांगत असे. रामुच धोतर थिजत होत. जिकडून वडाव तिकडून टराटरा फाटत जाणार होत. दोन धोतराची जोडी व दोन बंडी एवढंच होत एक शर्ट होत ते पण फाटायला आलेलं. कोण्या गावी नसता पोरीकडं जायचं तेव्हा घालायचा. राधाची पण अवस्था काही वेगळी नव्हती. लुगड्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या, पदर फाटला होता तरी डोक्यावर असायचा. लुगड्याच्या गाठी गाठी दिसायच्या. दोघेही वयान फार मोठी नव्हती पण दारिद्र्यान ते वयस्कर दिसत होते. मुलगा शाळेत जायचा. त्याच्या पण पॅन्ट ला राधान ठिगळ जोडुन दिले होते. दप्तर तर नव्हतेच पण एक पिशवी ती पण फाटून फाटून गेलेली होती. अर्धे पुस्तक त्याला हातात न्यावी लागायची. अशी रामू राधाच्या कुटुंबात दारिद्र्य ओसरून वाहत होत. गरिबी सुटता सुटत नव्हती. पण त्याच्या घरात  आल्यागेल्याचा आदर, प्रेमळ बोलणं, प्रामाणिक वृत्ती, होतकरू स्वभाव, कर्तव्यदक्षता, माणुसकी, कष्टाळू वृत्ती दिसत होती.....
मग गरीब कोण??????
                                      लेखिका
                             तेजस्विनी प्र.राऊत

Post a Comment