Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

पूर डोळ्यात दाटला

माझ्या माहेराच्या गावा, त्याने हैदोस घातला... शेतीसाठी मागितला, तो घराघरात साचला... माझ्या माहेराच्या गावा, त्याचे सुरूच थैमान... घरदार पाणी पाणी, सुरक्षेला धावला जवान(रेस्क्यू टिम)... माझ्या माहेराच्या गावा, त्याचा धुमाकूळ चालू ... गावा आख्खा आज माझा, जणू बेट लागला भासू... नाही घरदार, ना रस्ता उरला... पाण्याखाली महामार्ग, जीव टांगणीला लागला... पंखामध्ये बळ, दिलामध्ये जिद्द, माणूस कमवायचा,त्यासाठीच जीवाची शर्त... कोण कोणाचे? कोठले ? कोणते? नाही काही ठाव, सुखरूप व्हावे सारे मनी हाच एक भाव.... माझ्या माहेराची लोक, माणुसकी जपती... नाही वळख तरी, एकमेकां मदत धाडती... माझ्या माहेराच्या गावा , घट्ट विळखा पुराचा... जीव कावरा बावरा, ठाव लागेना मनाचा.... माझ्या माहेराच्या गावा, पाऊस पेटला पेटला... मी इथे (सासरी) सुखरूप, तरी पूर डोळ्यात दाटला.... कवी - जे . सागर
माझ्या माहेराच्या गावा,
त्याने हैदोस घातला...
शेतीसाठी मागितला,
तो घराघरात साचला...

माझ्या माहेराच्या गावा,
त्याचे सुरूच थैमान...
घरदार पाणी पाणी,
सुरक्षेला धावला जवान(रेस्क्यू टिम)...

माझ्या माहेराच्या गावा,
त्याचा धुमाकूळ चालू ...
गावा आख्खा आज माझा,
जणू बेट लागला भासू...

नाही घरदार,
ना रस्ता उरला...
पाण्याखाली महामार्ग,
जीव टांगणीला लागला...

पंखामध्ये बळ, दिलामध्ये जिद्द,
माणूस कमवायचा,त्यासाठीच जीवाची शर्त...
कोण कोणाचे? कोठले ? कोणते? नाही काही ठाव,
सुखरूप व्हावे सारे मनी हाच एक भाव....

माझ्या माहेराची लोक,
माणुसकी जपती...
नाही वळख तरी,
एकमेकां मदत धाडती...

माझ्या माहेराच्या गावा ,
घट्ट विळखा पुराचा...
जीव कावरा बावरा,
ठाव लागेना मनाचा....

माझ्या माहेराच्या गावा,
पाऊस पेटला पेटला...
मी इथे (सासरी) सुखरूप,
तरी पूर डोळ्यात दाटला....

कवी - जे . सागर

Post a Comment