Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link
Posts

माझ्या आजीचा शृंगार- कविता

कविता- आज शृंगार वाढला, त्याच्या पद्धती वाढल्या... पण जी सर आजीच्या एका पेटित होती ती आजच्या ब्युटी पार्लर मद्ये नाही...म्हणून आजी चे रूप खुलून दिसायचे.... ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न...... माझ्या आजीचा शृंगार एका पेटित लपला टिळा कुंकवाचा मोठा रुबाबात कपाळी बसला.... मायेच्या पेटित माया असे कंगवा, फणी त्यात कोपऱ्यात बसे एका मेणाची डबी... इवलासा पावडर डबा त्यात तेलाची कुपी त्यात आरसा मावला जणू शृंगार रुपी..... दारी बसून केली मायेन वेणी फणी झाला शृंगार मायेचा आरशात पाहून हसली मनी.... आजा भारी खुश आजीच्या टीळ्यावर म्हणे शोभतो रुबाब माझं नाव माथ्यावर.... कवी, काव्या.... ( यवतमाळ ) @Marathi_Kavita

आज शृंगार वाढला, त्याच्या पद्धती वाढल्या... पण जी सर आजीच्या एका पेटित होती ती आजच्या ब्युटी पार्लर मद्ये नाही...म्हणून आजी चे रूप खुलून दिसायचे.... ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न......


माझ्या आजीचा शृंगार

एका पेटित लपला
टिळा कुंकवाचा मोठा
रुबाबात कपाळी बसला....

मायेच्या पेटित माया

असे कंगवा, फणी
त्यात कोपऱ्यात बसे
एका मेणाची डबी...

इवलासा पावडर डबा

त्यात तेलाची कुपी
त्यात आरसा मावला
जणू शृंगार रुपी.....

दारी बसून केली

मायेन वेणी फणी
झाला शृंगार मायेचा
आरशात पाहून हसली मनी....

आजा भारी खुश

आजीच्या टीळ्यावर
म्हणे शोभतो रुबाब
माझं नाव माथ्यावर....

   कवी,

  काव्या....

1 comment

  1. खूप छान...