Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

बळीचा वारस 'क्रांतीसुर्य

अखंड तेवणारा प्रकाश तीव्र झाला, 'जोतिबा' तुमच्या येण्याने मानव धन्य झाला! तुमच्या लेखणीने समाजात विद्रोह केला, जुन्या थोतांडाच्या ,परंपरेचा धिक्कार केला, न डगमगता तुम्ही अन्यायाशी लढला, तुमच्या सत्यशोधकाने आदर्श घडला!

अखंड तेवणारा प्रकाश तीव्र झाला,
'जोतिबा' तुमच्या येण्याने मानव धन्य झाला!

तुमच्या लेखणीने समाजात विद्रोह केला,
जुन्या थोतांडाच्या ,परंपरेचा धिक्कार केला,
न डगमगता तुम्ही अन्यायाशी लढला,
तुमच्या सत्यशोधकाने आदर्श घडला!

तुम्ही सांगितला सत्याचा धर्म,
आपणच घडवी स्वतःचे कर्म,
तुझ्याच आदर्शाने भीमही घडला,
मानव जातीसाठी अन्यायाशी लढला!

तुच दिलं मुलींस शिक्षण,
बळीचा शोभे वारस,करतो तुज औक्षण!
तुमची आणि सावित्रीची जोडी शोभे देखणी,
अजून दगडाला पाझर फोडी तुमचीच लेखणी!!!


            कवी -राहुल पिसाळ
                       

Post a Comment