Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

माझे सोबती

marathi goshti अरे व्वा! माझ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होणारआहेत.मी माझ्या सोबतींना आज पुन्हा भेटणार आहे. लहानपणी मला आमच्या घरी कुत्रा पाळवा असे वाटे.पण घरच्यांचा विरोध होता त्यामुळे मी थोडेसे धाडस करून एक पिल्लू घरी आणले होते.ते आमच्या घराशेजारी एक कपाशीची झाड होते . त्याला तिथे ठेवायचो.सकाळी उठल्याबरोबर  त्याला भेटायला  जायचो . सकाळच्या नाष्ट्यामधील अर्धी चपाती त्याला द्यायचो.पण शाळेला गेल्यानंतर तो एकटाच घरी असायचा ‌.काही दिवसांनी ते पिल्लू दिसेनासे झाले.मन अस्वस्थ झाले होते.त्याला शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ते एका विहिरीत मेलेल्या अवस्थेत सापडले.त्यादिवशी मी नीट जेवू शकलो नाही आणि त्याचीच सतत आठवण येत होती.त्यानंतर ही एक कुत्र्याचे लहान पिल्लू पाळले होते.घरी आल्यानंतर मी आणि माझी बहीण त्यांच्याशी शिवा-भावणी(पकडा पकडी)खेळ खेळायचो.खुप आनंद यायचा.त्यानंतर ते ही पिल्लू निघून गेले त्याच्यानंतर म्हणून मी कुत्र्याचे पिल्लू आजपर्यंत पाळले नाही.आजही त्यांची आठवण आली तरी ते दिवस पुन्हा जगावसे वाटतात.      आम्ही खेडेगावात असल्याने आमच्यात शरडे(बकरी) पाळले जातात.आणि आमच्यात दोन शरड्या होत्या . दोन्हीही व्याल्या होत्या एकदिवशी सकाळी भल्या पहाटे साडेचार वाजता आमची लहान शेरडी जोरात ओरडून मेली!मला सकाळी कळलं.पण प्राण्यांचा एक सवय आहे ते दुसऱ्या प्राण्यांच्या बाळांना जवळ करत नाही.मेलेल्या शेरडीला दोन लहान अशी गोंडस पिल्ले होतो.एक पाठ आणि बोकड(बकरा आणि बकरा) ते सकाळपासून ओरडत होते त्यांची आई त्यांना कुठेच दिसत नव्हती.त्यांच्या ओरडण्याने मनाला चर्रर होत होतं.ते ऐकून मी आणि माझी बहीण रडू लागलो होतो.मम्मीने सांगितले की,त्या दोघांची काळजी दोघांनीच घ्यायची . माझ्या बहीणीने बकऱ्याची काळजी घेत होती तर मी माझ्या बकरीची. दोघांची नावं ठेवली.बोकडाचे साई बाबा तर माझ्या बकरीचे वैष्णवी नाव ठेवले.दररोज सकाळी आम्ही उठल्याबरोबर त्यांच्याशी अशाच गप्पा मारायचो.माझ्या  आणि बहिणीचे तर भांडण व्हायचे कारण तुझी वैष्णवी माझ्या बाबाला काही खाऊ देत नाही अशी म्हणायची!मी म्हणायचो की बघ तुझा बाबा किती मोठा झालाय माझ्या बिचाऱ्या वैष्णवीच  सगळंच गवत खातोय.   सकाळी वैष्णवी आणि बाबाला पिठाची कणीक चारणे हा आमचा दिनक्रम झालता.त्यानंतर कोवळे गवत त्याला खायला टाकणे ही रोजचीच सवय झाली होती.जसे दिवस जाऊ लागले तशी वैष्णवी आणि बाबा मोठे होत गेले.आणि त्यांना विकण्यासाठी आता व्यापारी बोलवू लागले.आम्ही बहीण भाऊ दोघे रडायचो.नाही विकून देणार अरे त्याची लहान असताना आई गेली आता त्यांना विकून मला का पोरका करताय??? विकायचीच होती तर कशाला जीव लावायला लावला!माझी आणि मममीची यावरून भांडणच झालं.पण वैष्णवीचा एक गुण होता की ती मला लगेच ओळाखायची.आणि एक सवय म्हणजे ती मान कशीपण फिरवायची त्यामुळे घरच्यांना भीती वाटायची.अगोदर बाबा विकला होता पण माझी वैष्णवी नव्हती विकली.पण मी शाळेला गेल्यानंतर तिलाही विकली गेली.मी घरी आल्यानंतर पाहतो तर काय वैष्णवी कुठेच दिसली नाही.मी वडिलांना विचारल तर ते म्हटले अरे विकली.मला इतकं आतून भरून आल होत की,मी आमच्या घराशेजारील ओढ्यावर जाऊन एका खडकाच्या आडोशाला बसून पाण्यात पाय सोडून रडत बसलो होतो.माझी बहीण मला हुडकत तिथे आली तिचीही बोलण्याची हिंमत नाही झाली.पण त्या दिवशी मी फक्त वैष्णवी वैष्णवी करून रडत होतो.त्यानंतर असं ठरवलं की कोणत्याही प्राण्याला इतका नाही जीव नाही लावणार कारण त्रास आपल्यालाच होतो. मी एक शिकलो की माणसांपेक्षा जास्त निस्वार्थी प्रेम फक्त प्राणीच करू शकतात.माणसाशी इमानाने वागतात.असे कितीतरी किस्से आहेत ते सांगू पण शकत नाही.पण वैष्णवी ही माझ्या आयुष्यातील रम्य असं पर्व होत हे कधीच मी विसरणार नाही. त्यानंतर घराशेजारील एक कुत्रा त्याला आम्ही प्रेमाने चंप्या म्हणतो.तो लहानपणापासून इतका इमानदार आहे.आपण जेवताना शेजारी बसेल पण टाकल्याशिवाय खाणार नाही.वस्तीवरील नाही तर गावातला डॉनच म्हणावा लागेल . त्याच्या भीतीने आमच्या वस्तीवर कोणी अनोळखी माणुस पण शक्यतो फिरकत नाही.त्याची  एक सवय म्हणजे आपण दगड फेकू तिकडे तो धाव घेतो. रात्रीचा काही आवाज झाला तर तो आपल्या अगोदर तिथे हजर होतो.रानात जायचं म्हटलं तरी तो आपल्यापुढे पळत असतो.खरच त्याच्यामुळे आमची संपूर्ण वस्ती  सुरक्षित आहे.    असे आजपर्यंत लाभलेले माझे निस्वार्थी सोबती!!!                          लेखक-राहुल पिसाळ
अरे व्वा! माझ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होणारआहेत.मी माझ्या सोबतींना आज पुन्हा भेटणार आहे.

लहानपणी मला आमच्या घरी कुत्रा पाळवा असे वाटे.पण घरच्यांचा विरोध होता त्यामुळे मी थोडेसे धाडस करून एक पिल्लू घरी आणले होते.ते आमच्या घराशेजारी एक कपाशीची झाड होते . त्याला तिथे ठेवायचो.सकाळी उठल्याबरोबर  त्याला भेटायला  जायचो . सकाळच्या नाष्ट्यामधील अर्धी चपाती त्याला द्यायचो.पण शाळेला गेल्यानंतर तो एकटाच घरी असायचा ‌.काही दिवसांनी ते पिल्लू दिसेनासे झाले.मन अस्वस्थ झाले होते.त्याला शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ते एका विहिरीत मेलेल्या अवस्थेत सापडले.त्यादिवशी मी नीट जेवू शकलो नाही आणि त्याचीच सतत आठवण येत होती.त्यानंतर ही एक कुत्र्याचे लहान पिल्लू पाळले होते.घरी आल्यानंतर मी आणि माझी बहीण त्यांच्याशी शिवा-भावणी(पकडा पकडी)खेळ खेळायचो.खुप आनंद यायचा.त्यानंतर ते ही पिल्लू निघून गेले त्याच्यानंतर म्हणून मी कुत्र्याचे पिल्लू आजपर्यंत पाळले नाही.आजही त्यांची आठवण आली तरी ते दिवस पुन्हा जगावसे वाटतात.

     आम्ही खेडेगावात असल्याने आमच्यात शरडे(बकरी) पाळले जातात.आणि आमच्यात दोन शरड्या होत्या . दोन्हीही व्याल्या होत्या एकदिवशी सकाळी भल्या पहाटे साडेचार वाजता आमची लहान शेरडी जोरात ओरडून मेली!मला सकाळी कळलं.पण प्राण्यांचा एक सवय आहे ते दुसऱ्या प्राण्यांच्या बाळांना जवळ करत नाही.मेलेल्या शेरडीला दोन लहान अशी गोंडस पिल्ले होतो.एक पाठ आणि बोकड(बकरा आणि बकरा) ते सकाळपासून ओरडत होते त्यांची आई त्यांना कुठेच दिसत नव्हती.त्यांच्या ओरडण्याने मनाला चर्रर होत होतं.ते ऐकून मी आणि माझी बहीण रडू लागलो होतो.मम्मीने सांगितले की,त्या दोघांची काळजी दोघांनीच घ्यायची . माझ्या बहीणीने बकऱ्याची काळजी घेत होती तर मी माझ्या बकरीची. दोघांची नावं ठेवली.बोकडाचे साई बाबा तर माझ्या बकरीचे वैष्णवी नाव ठेवले.दररोज सकाळी आम्ही उठल्याबरोबर त्यांच्याशी अशाच गप्पा मारायचो.माझ्या  आणि बहिणीचे तर भांडण व्हायचे कारण तुझी वैष्णवी माझ्या बाबाला काही खाऊ देत नाही अशी म्हणायची!मी म्हणायचो की बघ तुझा बाबा किती मोठा झालाय माझ्या बिचाऱ्या वैष्णवीच  सगळंच गवत खातोय.

  सकाळी वैष्णवी आणि बाबाला पिठाची कणीक चारणे हा आमचा दिनक्रम झालता.त्यानंतर कोवळे गवत त्याला खायला टाकणे ही रोजचीच सवय झाली होती.जसे दिवस जाऊ लागले तशी वैष्णवी आणि बाबा मोठे होत गेले.आणि त्यांना विकण्यासाठी आता व्यापारी बोलवू लागले.आम्ही बहीण भाऊ दोघे रडायचो.नाही विकून देणार अरे त्याची लहान असताना आई गेली आता त्यांना विकून मला का पोरका करताय???
विकायचीच होती तर कशाला जीव लावायला लावला!माझी आणि मममीची यावरून भांडणच झालं.पण वैष्णवीचा एक गुण होता की ती मला लगेच ओळाखायची.आणि एक सवय म्हणजे ती मान कशीपण फिरवायची त्यामुळे घरच्यांना भीती वाटायची.अगोदर बाबा विकला होता पण माझी वैष्णवी नव्हती विकली.पण मी शाळेला गेल्यानंतर तिलाही विकली गेली.मी घरी आल्यानंतर पाहतो तर काय वैष्णवी कुठेच दिसली नाही.मी वडिलांना विचारल तर ते म्हटले अरे विकली.मला इतकं आतून भरून आल होत की,मी आमच्या घराशेजारील ओढ्यावर जाऊन एका खडकाच्या आडोशाला बसून पाण्यात पाय सोडून रडत बसलो होतो.माझी बहीण मला हुडकत तिथे आली तिचीही बोलण्याची हिंमत नाही झाली.पण त्या दिवशी मी फक्त वैष्णवी वैष्णवी करून रडत होतो.त्यानंतर असं ठरवलं की कोणत्याही प्राण्याला इतका नाही जीव नाही लावणार कारण त्रास
आपल्यालाच होतो.

मी एक शिकलो की माणसांपेक्षा जास्त निस्वार्थी प्रेम फक्त प्राणीच करू शकतात.माणसाशी इमानाने वागतात.असे कितीतरी किस्से आहेत ते सांगू पण शकत नाही.पण वैष्णवी ही माझ्या आयुष्यातील रम्य असं पर्व होत हे कधीच मी विसरणार नाही.

 त्यानंतर घराशेजारील एक कुत्रा त्याला आम्ही प्रेमाने चंप्या म्हणतो.तो लहानपणापासून इतका इमानदार आहे.आपण जेवताना शेजारी बसेल पण टाकल्याशिवाय खाणार नाही.वस्तीवरील नाही तर गावातला डॉनच म्हणावा लागेल . त्याच्या भीतीने आमच्या वस्तीवर कोणी अनोळखी माणुस पण शक्यतो फिरकत नाही.त्याची  एक सवय म्हणजे आपण दगड फेकू तिकडे तो धाव घेतो. रात्रीचा काही आवाज झाला तर तो आपल्या अगोदर तिथे हजर होतो.रानात जायचं म्हटलं तरी तो आपल्यापुढे पळत असतो.खरच त्याच्यामुळे आमची संपूर्ण वस्ती  सुरक्षित आहे.

   असे आजपर्यंत लाभलेले माझे निस्वार्थी सोबती!!!
                         लेखक-राहुल पिसाळ

Post a Comment