Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

वाटण्या

​पोळल्या आठवणी पोळल्या त्या भावना... राख झाली हृदयाची न आमच्या पाडल्या वाटण्या.... कधी विलग झालोच नव्हतो आज पडद्याची भिंत आहे... मी ह्याची न तो त्याचा आता हाकेलाही मज्जाव आहे... ​किती त्या वचनांची झाली ​उगाचची दैना बघा... ​त्याच्या विना घेतलेला हा ​आज पहिला श्वास आहे... ​एकाच वसरीवरती बसून ​अंतर मैलाचे आमच्यात आज ​हसतो तो ही न मी ही पण ​हा आतला आकांत भयाण आहे... ​प्रिय माझा हा न प्रिय त्याचा तो ​खेळ आमचा रंगतो आन ​खेळायला आम्ही बाद गडी ​पण आव जिंकण्याचा आणतो... ​एकाच अंगणात डाव ​नियती भारी टाकून जाते ​जन्माच्या सोबतींना असेच ​मुलामुलांत वाटून देते... तांबे अस्मिता

​पोळल्या आठवणी
पोळल्या त्या भावना...
राख झाली हृदयाची न
आमच्या पाडल्या वाटण्या....

कधी विलग झालोच नव्हतो
आज पडद्याची भिंत आहे...
मी ह्याची न तो त्याचा आता
हाकेलाही मज्जाव आहे...

​किती त्या वचनांची झाली
​उगाचची दैना बघा...
​त्याच्या विना घेतलेला हा
​आज पहिला श्वास आहे...

​एकाच वसरीवरती बसून
​अंतर मैलाचे आमच्यात आज
​हसतो तो ही न मी ही पण
​हा आतला आकांत भयाण आहे...

​प्रिय माझा हा न प्रिय त्याचा तो
​खेळ आमचा रंगतो आन
​खेळायला आम्ही बाद गडी
​पण आव जिंकण्याचा आणतो...

​एकाच अंगणात डाव
​नियती भारी टाकून जाते
​जन्माच्या सोबतींना असेच
​मुलामुलांत वाटून देते...

                    तांबे अस्मिता

Post a Comment