Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

माझा जन्म

इवल्याश्या हातावर, जीव कसा तरला! तुला सुई टोचताना, बाईंनी हात जोडला! अंधार खोलीमध्ये, कसा जन्म झाला! तू रडताना सारा, दवाखाना जागविला! तुझ्या येळला खोलीत, साऱ्या पोरीच जन्मल्या! तु एकटाच पोरानं, जोरात भोंगा पसरवला! किरकोळ बाळ, अंगानं बारीक, चार वरीस न बोललं, जसं की मुकच वाटलं! घरात साऱ्यांचा लाडका तुच, कधीच आजीचा पदर नाही सोडला, पहाटेचा तुझा कुंभकर्ण व्हायचा, उंबराच्यासंगे नाष्टा करायचा! कधी मृदंगाच्या तालाची, कणिक खाल्ली तर, कधी पोपटाचा उष्टा, पेरूची चव चाखली! हळूहळू बोलू लागला, चाचरत होईना व्यक्त झाला! आता कसा पोपट बोलतो, तालांसगे मृदंग बोलतो! माझ्याच पोटासाठी, आईने सोडला उंबरठा! चप्पलांच्या झिजल्या टाचा, उपसून कष्टाच्या खाचा! तिनेच दिलेला रुपया, आनंदाचा होता! आजच्या लाखोमध्ये, तो भाव खोटा होता!!                  ✍️कवी-राहुल पिसाळ
इवल्याश्या हातावर,
जीव कसा तरला!
तुला सुई टोचताना,
बाईंनी हात जोडला!

अंधार खोलीमध्ये,
कसा जन्म झाला!
तू रडताना सारा,
दवाखाना जागविला!

तुझ्या येळला खोलीत,
साऱ्या पोरीच जन्मल्या!
तु एकटाच पोरानं,
जोरात भोंगा पसरवला!

किरकोळ बाळ,
अंगानं बारीक,
चार वरीस न बोललं,
जसं की मुकच वाटलं!

घरात साऱ्यांचा लाडका तुच,
कधीच आजीचा पदर नाही सोडला,
पहाटेचा तुझा कुंभकर्ण व्हायचा,
उंबराच्यासंगे नाष्टा करायचा!

कधी मृदंगाच्या तालाची,
कणिक खाल्ली तर,
कधी पोपटाचा उष्टा,
पेरूची चव चाखली!

हळूहळू बोलू लागला,
चाचरत होईना व्यक्त झाला!
आता कसा पोपट बोलतो,
तालांसगे मृदंग बोलतो!

माझ्याच पोटासाठी,
आईने सोडला उंबरठा!
चप्पलांच्या झिजल्या टाचा,
उपसून कष्टाच्या खाचा!

तिनेच दिलेला रुपया,
आनंदाचा होता!
आजच्या लाखोमध्ये,
तो भाव खोटा होता!!

                 ✍️कवी-राहुल पिसाळ

Post a Comment