Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Test link

माझ्या राजाचा पाळणा....

हलवा पाळणा पाळणा पुत्र जिजाऊंचा जन्मा आला ग आला ग राजा रयतेचा.. शिवनेरी दुमदुमली दुमदुमली हाक त्याची येता कानी आई जिजाऊ जिजाऊ हर्षल्या ग मनी.... पिता शहाजी शहाजी शिकवती बाळा पायी शोभिला शोभिला ऋणझुनता वाळा.... इवले पाऊल पाऊल रमती रणभूमी स्वराज्य रेखिले रेखिले कल्पना त्याची मनी..... जपली शिवबाने शिवबाने राज्याची प्रतिष्ठा प्रजेची असती रे असती रे राजावर निष्ठा.... मन, धन अर्पिले अर्पिले त्यांनी रयतेसाठी आई जिजाऊंचा जिजाऊंचा हाथ त्यांच्या पाठी.... प्राणपनी लढती लढती शिवरायांचे दोस्त शत्रूंच्या चिंधड्या चिंधड्या केल्या असे फस्त.... गुण किती गाऊ ग गाऊ ग गाथा संपेना मोठी कारकीर्द कारकिर्द मला गाता येईना.... शिवबा राजाने राजाने रेखीलया नजरा माझ्या राजाला राजला त्रिवार मुजरा... बाळा जो जो रे जो जो रे शिवनेरीच्या सूता उठ लवकरी लवकरी वाट पाही तुझी रे माता... कवी, तेजस्विनी प्र. राऊत

हलवा पाळणा पाळणा
पुत्र जिजाऊंचा
जन्मा आला ग आला ग
राजा रयतेचा..
शिवनेरी दुमदुमली दुमदुमली
हाक त्याची येता कानी
आई जिजाऊ जिजाऊ
हर्षल्या ग मनी....
पिता शहाजी शहाजी
शिकवती बाळा
पायी शोभिला शोभिला
ऋणझुनता वाळा....
इवले पाऊल पाऊल
रमती रणभूमी
स्वराज्य रेखिले रेखिले
कल्पना त्याची मनी.....
जपली शिवबाने शिवबाने
राज्याची प्रतिष्ठा
प्रजेची असती रे असती रे
राजावर निष्ठा....
मन, धन अर्पिले अर्पिले
त्यांनी रयतेसाठी
आई जिजाऊंचा जिजाऊंचा
हाथ त्यांच्या पाठी....
प्राणपनी लढती लढती
शिवरायांचे दोस्त
शत्रूंच्या चिंधड्या चिंधड्या
केल्या असे फस्त....
गुण किती गाऊ ग गाऊ ग
गाथा संपेना
मोठी कारकीर्द कारकिर्द
मला गाता येईना....
शिवबा राजाने राजाने
रेखीलया नजरा
माझ्या राजाला राजला
त्रिवार मुजरा...
बाळा जो जो रे जो जो रे
शिवनेरीच्या सूता
उठ लवकरी लवकरी
वाट पाही तुझी रे माता...
                                  कवी,
                         तेजस्विनी प्र. राऊत

Post a Comment