राम राम 🙏मास्टर
मी मधुरेचा बाप👳
लयी दुरून आलो आज
तुमाले विचारले जाब
त्या दिवसाच्या पराक्रमाची गोष्ट
माया कानावर पडली
सोन्यासारखी पोर मायी
काल ढसाढसा हो रडली 😓
पैसे देले नाही मनुन तुमी
माया पोरीले खोलीबाहेर हाकलल
अन गरीबाच्या लेकराले तुमि
पुन्हा गरिबीतच ढकललं😶
पोरगी मने मायी मले ,बाबा
मी शिकून मोठी डाक्टर होतो
गरिबीतून शिकून मी आता
पुढं गरीबाचचं भलं करतो 😊
पोरीचं सपान आयकून म्या
एका डॉक्टर ले भेटलो
त्याची गोष्ट आयकून तर
हायच खाऊन बसलो 😑
तो सांगे मले, त्याच्या बापान
त्याच्यासाठी इकल होत वावर
पैसाशिवाय रावजी आजकाल
चालत नाही कोणताच पावर😣
डाक्टरकीसाठी आता रावजी
नीटले नंबर लावा लागते
अन नीट साठी पण तुमाले
आधी पैसाच मागते 🙄
माया ताटात म्या अजून
साद बिट पायलं नाही
पोरीच्या नीट पायी आजकाल
भाजीलेही तेल भेटत नाही😔
साजरी पोर पाहून मायी
नातलग तिच्या लग्नासाठी मरते
शहरात पोर बिगडते सांगून
तिले घरी आणच करते ☹️
पोरीचं सपान सांगता सांगता
समजातही आमी आंबून गेलो
अन पोर जवा रडली मायी
मी तवाच अर्धा मेलो 😒
तुमाले तुमच्या मायबापान
गरिबीतूनच शिकवलं असण
तुमाले पैसे पाठून त्यायन
दोन्ही यळला खाल्लं असण बेसन 🙁
गरिबीची जाण ठेवा मास्तर
तुमीबी तिथूनच आलात
डोळ्याले पैसा दिसल्यावर
मायबापाले बी ईसरून गेलात 😣
सांगतो माया पोरीले म्या , बाई
फेक ते पुस्तक अन घे हातात लाटणं
शिकूनही काय करत माय तू
नुसते पैसेवाल्याचे पाय चाटण 😏
पैसेवाल्याच्याच लेकराले तुमी आता
डाक्टर , इंजिनिअर होऊ दया
आमा गरिबाले तुमी आताही
या गरिबीतच सडू दया....😢
🖊️प्रिया गाडे